सह्यांद्री प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

89

चंद्रपुर

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (नागपूर सर्कल)च्या वतीने वृक्षारोपण पंधरवडा दि.२८ जून ते १२ जुलै २०२० या कालावधी मध्ये वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला आहे  या अनुषंगाने सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर विभागाच्या वतीने आज चंद्रपूर शहराचे वैभव असलेले गोंडराजा समाधी स्थळ, अंचल्लेश्वर मंदीर, अंचल्लेश्वर गेट या परिसरात स्वदेशी झाडांची रोपे व रोपांच्या सुरक्षतेसाठी टी गार्ड लावण्यात आले.
हा वृक्षारोपण कार्यक्रम केंद्र पुरातत्व विभागाचे अधिकारी
विक्रांत कुमार, प्रविन उंनदिरवाडे, प्रशांत दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला
सौ.राखीताई कंचलावार महापौर महानगर पालीका चंद्रपूर, वंसता देशमुख गट नेते महानगर पालीका चंद्रपूर,
संजय कंचलावार सामाज सेवक,निलेश खोब्रागडे नगर सेवक चंद्रपूर ,भारतीय पुरातत्व सर्वेक्षण उपमंडल चंद्रपूर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले

यावेळेस वृक्षारोपण कार्यक्रमाला शशिकांत देशकर, दिलिप वासुदेवराव रिंगणे, प्रज्वल गर्गेलवार, अनुश्री घोटेकर, श्याम बोबडे, शुभम कोरम, केतन दुर्शेलवार,  वैभव येरगुडे, साहिल असुदे, हर्षल येरवार, अभय जिंजीवाल, गौतम अभिनव व सह्यांद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी व चमू उपस्थित होते