घुग्गुस येथे राजगॄहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

0
110

घुघुस

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक “राजगॄह” या निवासस्थानी झालेल्या तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असुन हे समाजविघातक विकॄत मानसिकतेच दुष्कॄत्य आहे. राजगॄह हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी हे घर पुस्तकांसाठी बांधले होते. आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येतात. आंबेडकरी जनतेचे अस्मितेचे हे एक महत्वाचे स्मारक आहे
या घटनेचे संतप्त पडसाद घुग्गुस येथे उमटले.

दिनांक ९ जुलैला घुग्गुस येथील गांधी चौकात चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतॄत्वात राजगॄहावरील भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध करण्यात आला.

यावेळी चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी राजगॄहावर हल्ला करणार्यांना तात्काळ अटक करा आणी या स्मारकाची तोडफोड करण्याची घटना महाराष्ट्र राज्यासाठी कलंकित करनारी घटना आहे. राजगॄहातुन अनुयायी उर्जा घेऊन निघतात, राजगॄहातुन देशाची राज्य घटना लिहिण्याचे पवित्र कार्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. परंतु महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकार राजगॄह सुरक्षीत ठेऊ शकले नाही. राजगॄह सुरक्षीत ठेवण्याकरीता सरकार ने पाऊल उचलावे असे ते म्हणाले

यावेळी घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, जिप सभापती नितु चौधरी, पंस उपसभापति निरीक्षण तांड्रा, सरपंच संतोष नुने, ग्रापं सदस्य साजन गोहने, संजय तिवारी,सिनु इसारप, भाजपा नेते बबलु सातपुते, प्रविण सोदारी, हेमंत पाझारे, राजु निखाडे, बबलु पाटील, प्रवेश सोदारी, महेंद्र साठे, तंमुस अध्यक्ष हसन शेख, मल्लेश बल्ला, संजय भोंगळे, अनिल मंत्रीवार, ग्रापं सदस्या पुजा दुर्गम, सुचिता लुटे, वैशाली ढवस, सुनंदा लिहीतकर व पुष्पा रामटेके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here