शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रप तर्फ मा.उपमुख्यमंत्री तथा शालेय शिक्षण व क्रीडामंत्री यांना निवेदन

0
105

चंद्रपूर

शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तथा  शालेय शिक्षण व क्रीडामंत्री वर्षाताई गायकवाड यांना जिल्हाधिकारी                   मार्फत  9वी , 10 वी आणि 12 वी अभ्यासक्रम कमी करण्याबाबत निवेदन प्रदेश अध्यक्ष श्री अमित ढमाळ यांच्या मार्गदर्शनात, प्रदेश उपाध्यक्ष शशीकांत देशकर यांच्या प्रमुख उपस्थित, जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

कोरोनामुळे संपूर्ण जग ग्रस्त आहे, त्याचा प्रादुर्भाव आपल्या देशात सुद्धा झालेला आहे.नवीन शैक्षणिक सत्र( 2020-21) 15 जूनला सुरू झाले असून, कोरोनाच्या प्रादुर्भावा असल्याने, शासनाने शाळा/कॉलेज ला ऑनलाइन क्लासेस घेण्याचे आदेश दिलेलेआहे. परंतु यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा/ कॉलेज नियमित कधी सुरू होणार याबद्दल विदार्थाना साशंकता आहे ,विद्यार्थी मानसिक तणावात असून , त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विदयार्थी आपल्या देशाचे भूषण आहे ,त्यांच्याबद्दल आपण सकारात्मक पाऊल उचलावे आणि चालू शैक्षणिक सत्रातील (2020-21) 9वी, 10 वी, 12वी चा अभ्यासक्रम आपण 30 % कमी करावा ( केंद्रीय मनुष्यबळ मंत्री श्री रमेशजी निरंक यांनी काल दिनांक 7 जुलै CBSE बोर्ड वर्ग 9 , 10 आणि 12 वीचा अभ्यासक्रम 30 % ने कमी केला असे जाहीर केले आणि आज 8 जुलै वर्तमानपत्रात छापून आलेले आहे.)जेणेकरून विदार्थाची भीती कमी होईल आणि येणाऱ्या परीक्षेत ते प्रभावी कामगिरी करू शकणार.निवेदन देतांना शरद पवार विचार मंच प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशकर,जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, संजय तुरीले, राजेंद्र नागरकर, मंगेश बोकडे, शुभम प्रजापती उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here