वनजमिनीवरील वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

122

 

चंद्रपूर,

उपसंचालक (बफर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील मौजा घंटाचौकी कक्ष क्र. 520 येथे दि. 7 जुलै रोजी 50 ते 60 लोकांनी 10-20 हेक्टर वन जमिनीवरील साग, पळस व इतर मौल्यवान प्रजातीचे हजारो वृक्षाची कुऱ्हाडीच्या सहाय्याने अवैध्य वृक्षतोड केल्या संदर्भात वनविभागाअंतर्गत कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर वनजमिनीवरील वृक्षतोड हि अवैध्यरित्या अतिक्रमण करुन शेती करण्याच्या दृष्टीने केलेली असून तिथे पाच ट्रॅक्टरच्या सहाय्याने 10 ते 20 हेक्टर वनक्षेत्रात अवैध्यरित्या नागरनी केली. सदर ठिकाणी वनकर्मचारी कार्यवाही करण्याकरिता पोहचले असता तेथील महिला, मुले व इतर लोकांनी कुऱ्हाड घेऊन शासकीय कामात अडथडा निर्माण करण्याचे प्रयत्न केले. सदर कार्यवाही अंतर्गत नागरनीसाठी वापरण्यात आलेले दोन ट्रॅक्टर वनविभागाने जप्त केले असून आरोपी विरुद्ध वनगुन्हा (पीओआर) नोंदविला. सदर प्रकरणी वनविभागांनी दोन ट्रॅक्टर जप्त केले व तेथील लोकांवर कार्यवाही केली म्हणून तेथील लोकांनी हातात कुऱ्हाड घेऊन शासकीय कामात अडथडा करून कर्मचाऱ्यांना धमकी दिली. त्यामुळे त्यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे गुन्हा (एफआयआर) नोंदविण्यात आले.

वन विभागाने नागरिकांना पुढील प्रमाणे आवाहन केले आहे. वनजमिनीवरील अतिक्रमण संदर्भात वनहक्क अधिनियम अंतर्गत दावे समितीकडे प्रलंबित असल्यास त्यांच्या विरुद्ध वनविभागामार्फत अतिक्रमण हटविणे बाबतची कार्यवाही करण्यात येणार नाही. त्याकरिता अतिक्रमण धारकाने सबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन दावे समितीकडे प्रलंबित असल्याचा पुरावा द्यावा.

वनजमिनीवरील अतिक्रमण संदर्भात वनहक्क अधिनियम अंतर्गत समितिने दावे नामंजूर केले असल्यास सदर अतिक्रमण धारकांनी वनजमिनीवर शेती न करता स्वतःहून सदर वनजमिनीवरील कब्जा सोडून वन विभागास सहकार्य करावे.

वनजमिनीवर अतिक्रमण करण्याच्या दृष्टीने कोणीही ट्रॅक्टर व इतर यंत्रणा देऊ नये अन्यथा वनविभागाद्वारे त्यांचे मालकावर नियमाप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करुन ट्रॅक्टर व इतर यंत्रणा जप्त करण्यात येईल.

00000