रोजगारासाठी महाजॉब पोर्टलवर नोंदणी  करावी – आ. किशोर जोरगेवार

0
122

चंद्रपुर

  कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणन्यासाठी करण्यात आलेल्या उपायोजनांमूळे अनेकांचा रोजगार गेला आहे. यावर तोडगा काढत बेरोजगार तरुणांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने महाजॉब पोर्टल सुरु करण्यात आले असून चंद्रपूरातील युवकांनीही या पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी  असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. नोंदणी करतांना अडचण आल्यास आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधाण्याचेही आवाहण यावेळी आ. जोरगेवार यांनी केले आहे.

        महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण आणि शहरी युवकांना त्यांच्या कौशल्याला साजेसा  जॉब मिळवण्याची संधी महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देत आहे. विविध कराराचा एक भाग म्हणून १४ देशाहून अधिक गुंतवणूकदाराच्या करारावर स्वाक्षर्या झाल्या आहेत आणि विविध उद्योग क्षेत्रातील या गुंतवणुकीची रक्कम २५ हजार कोटीपेक्षा अधिक असेल नव्या गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करणे सहज शक्य व्हावे यासाठी  महाराष्ट्र शासन प्रयत्नशील  आहेत. या योजनेअंतर्गत अधिकाधिक बेरोजगार तरुणांना उत्तम रोजगार मिळवा याकरीता राज्य सरकारच्या वतीने महाजॉब पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या महापोर्टल जॉब पोर्टला तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

         चंद्रपूरात मोठया प्रमाणात उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्थानिक भुमीपुत्रांनाच रोजगार मिळावा या करीता मी प्रयत्नशील आहे अशात चंद्रपूरातील बेरोजगार युवकांनीही कुशल अकुशल रोजगारासाठी राज्य सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या महाजॉब पोर्टलवर नोंदणी करावी  असे  आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. यात १० अनुत्तीर्ण ते पदवी धारक पदोत्तर या पोर्टलवर नोंदणी करू शकतात   सदर पोर्टलवर नोंदणी  करतांना अडचण आल्यास आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहणनही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here