घुग्घुस नगरपरिषदेचा मार्ग होणार मोकळा :- पालकमंत्री विजय वड्डेटिवार

0
80

 

घुग्घुस :

चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेले घुग्घुस शहर मागील 20 वर्षापासून नगर परिषद होण्या करिता चातकासारखी वाट बघत आहे.
ज्येष्ठ नेते शामराव बोबडे यांनी घुग्घुस नगरपरिषदे करीता आपल्या जीवनाचा बहुमुल्य वर्ष दिली अनेक अनेक राजकीय नेते, सामाजिक नेते यांनी अहोरात्र परिश्रम घेतले अनेक आंदोलन केले.
या क्षेत्रातील तत्कालीन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्घुस नगरपरिषद झाल्याचे घोषित ही केले होते.
मात्र राज्यात गेली 05 वर्ष भाजपची सत्ता असतांना देखील त्यांच्याच जिल्हा परिषद अध्यक्षाने जिल्हापरिषदेत घुग्घुस नगरपरिषदेचा ठराव धुडकावून लावला होता.
अश्या विपरीत परिस्थितीत घुग्घुस काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांनी घुग्घुस शहराला नगरपरिषदेचा दर्जा मिळालाच पाहिजे याकरिता महाविकास आघाडी सरकारकडे पाठ पुरावा शुरू केला.
या प्रकरणातील जुने – जाणते शामराव बोबडे यांना सर्व कागद पत्रासह मुंबई येथे नेले.
पालकमंत्री साहेबांना विनंती करून ग्रामविकास मंत्र्याकडे बैठक लावली व सतत मुंबई येथे जाऊन आमदार किशोर जोरगेवार यांना सोबत घेऊन पाठ पुरावा केला.
त्यानंतर मात्र कोरोना विषाणूने कहर केला व घुग्घुस नगरपरिषदेचा विषय मागे पडला मात्र दिनांक 10 जुलै रोजी चंद्रपूर येथील नियोजन भवनात पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी राजूरेड्डी यांना तुझ्या मेहनतीला फळ येत असून पहिल्या कॅबिनेट मध्ये तुझी नगरपरिषद पास करतो अश्या शब्दात पाठीवर हात ठेवला असता आपला नेता एवढ्या संकटाच्या काळात ही कार्यकर्त्यांचा विसर पडू देत नाही.
त्याच्या मागणीला पूर्ण ताकदीनिशी रेटून धरतो याचा प्रत्यय आला.
याप्रसंगी घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी हे भारावून गेले तसेच या नगरपरिषदेमुळे माझ्या घुग्घुसचा संपुर्ण विकास होण्यासाठी मदद होईल याकरिता त्यांनी या मागणीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदद करणाऱ्या लढा देणाऱ्या सर्वांचा आभार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here