भाजपाचे चंद्रपूर जिल्हात बदलते राजकारण

0
86

 

बल्लारपूर-अक्षय भोयर (ता,प्र)

देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष समोर आला आहे, त्याततच चंद्रपूर जिल्हात सुद्धा भाजपाचे वर्चस्व दिसू लागले होते , मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणूकी नंतर भाजपाचे वर्चस्व कमी दिसू लागले ,
२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे ४ आमदार होते ,
परंतु २०१९ ला भाजपा -शिवसेना युतीत निवडणूक लढवून सुद्धा जिल्हात भाजपाचे फक्त 2 आमदार निवडून आले ,
भाजपा प्रदेश कार्यकारणी गठीत झाली , चंद्रपूर जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा जी यांना परत जिल्हा अध्यक्ष बनविणार असे सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत होते , मात्र हरीश शर्मा यांना प्रदेश कार्यकारणी सदस्य बनवून त्यांची तोफ थंडाविण्याचे काम वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले असे सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे मत आहे,जिल्हात नवे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांना ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बनविण्यात आले
तर जिल्हा शहर अध्यक्ष म्हणून डॉक्टर गुलवडे यांची वर्णी लागली,
आता देवराव भोंगळे संपूर्ण जिल्हात मराठी लॉबिंग चालवण्याच्या प्रयत्नात आहे असे सूत्रांची माहीती आहे, संपूर्ण जिल्हात मराठी माणसाला पुढे आणण्याची तयारी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष्यांची असल्याची चर्चा संपूर्ण जिल्हात आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here