उत्खनन अधिकारी “तोतया” प्रकरणात एकास अटक

0
88

 

घुगूस

 आरोपी विक्रांत उर्फ विक्की परमेश्वर झामरे (३९) रा.संतोषीमाता वार्ड बल्लारशाह यास शुक्रवार ला मध्यरात्री घुग्घुस पोलीसांनी अटक केली आहे तर बाकीचे आरोपी फरार आहे रेती तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या महिलेविरुद्ध घुग्घुस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या 19 जून शुक्रवारला घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा येथे उत्खनन अधिकारी असल्याची सांगुन रेती तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या तोतया महिला व तिच्या साथीदारांचा व्हीडीओ वायरल झाला. घुग्घुस परिसरातील रेती तस्करांनी आपला मोर्चा वढा नदीच्या रेती घाटांवर वळविला आहे. वढा गावाच्या रेती घाटांवरुन अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर ट्राली द्वारे सुरु होती. हिच संधी साधुन प्रिया झांबरे महिलेने स्काॅर्पीओ क्रमांक एमएच ३४ बीएफ ४४४९ मध्ये तिन इसमांना सोबत घेऊन वढा गावात दाखल होऊन त्यांनी गावचे पोलीस पाटील किसन वरारकर यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला व आम्ही उत्खनन विभागातुन आलो आहे, असे सांगितले. पोलीस पाटील येताच त्यांच्या सोबत रेता वाटांवर जाऊन एक ट्रॅक्टर पकडले व त्यालाही तेच सांगुन ट्रॅक्टर लावण्याची धमकी दिली. त्या ट्रॅक्टर धारकाकडुन हजारों रुपयाची मोठी रक्कम वसुल करुन तथाकथितांनी पोबारा केला.

“भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक अल्का खेडकर यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपुर व जिल्हा उत्खनन अधिकारी यांना माहिती दिली. त्यांचे आदेश मिळताच तथाकथित एका महिलेची व तिच्या तिन सहकारी विरुद्ध पोलीसांत तक्रार दिली.”
यात पैश्याची देवाण घेवाण करनारे रेती तस्कर व तोतया उत्खनन अधिकारी महिला व तिचे सहकारी अडकण्याची दाट शक्यता आहे. रेती तस्करांवर ही गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे
दरम्यान घुग्घुस परिसरातील रेती तस्करीमुळे सर्वसामान्यांचा प्रशासनावर रोष प्रचंड तिव्र झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here