महानायक अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चन चा अहवाल पॉझिटिव्ह

0
84
मुंबई
        राज्यात झपाट्याने कोरोना विषाणू पसरत आहे, सध्या या कोरोनामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे, काल रात्री दरम्यान चित्रपट सृष्टीमधील महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली, यांच्यासह अभिषेक बच्चन चा सुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जया भादुरी व ऐश्वर्या रॉय यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.
अमिताभ बच्चन यांना कोरोना झाला ही माहिती स्वतः त्यांनी ट्विट केली.
सध्या महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून हि माहिती दिली आहे.
तसेच अमिताभ यांचे चिरंजीव अभिनेते अभिषेक बच्चन यांची देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचे समजते आहे.
दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे.
तसेच अमिताभ यांच्या कुटुंबातील व्यक्तींची देखील तपासणी केली जात असल्याची माहिती मिळते आहे.
अमिताभ बच्चन यांना किडनीचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here