छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वोनोद करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – टायगर ग्रुप

0
95

 

बल्लारपूर:अक्षय भोयर (ता. प्र)

स्टॅंडर्ड कॉमेडियन अग्रीमा जोषुवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टायगर ग्रुप बल्लारपूर च्या वतीने केली आहे

स्टॅंडर्ड कॉमेडियन अग्रिमा जोषुवा तिच्याविरोधात सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट उसळलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज बद्दल केलेल्या विनोदामुळे तिच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे अग्रीमा जोषुवाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून अग्रमी यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी टायगर ग्रुप बल्लारपूर तर्फे पोलीस निरीक्षक शिवलाल भगत यांच्याकडे निवेदना देऊन करण्यात आलेली आहे
मुंबई अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल अग्रिमा जोषुवा ने विनोदातून टीका केली त्याच्या निषेध करून
निवेदन देण्यात आले यावेळेस टायगर ग्रुप बल्लारपूर प्रमुख सदस्य रवि राठोड आदित्य शिंगाडे कुणाल बहुरीया गौरव नाडमवार पवन नार्मलवार सतीश गाडगुळवर केतन भेंडे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here