सैनिक शाळेचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम

0
102

 

बल्लारपूर-अक्षय भोयर(ता.प्र)

चंद्रपूर जिल्हात नव्याने तयार झालेल्या सैनिक शाळेचे काम नियती नामक कंपनी पुणेच्या माध्यमातून होत असून राज्य सरकार च्या माध्यमातून या शाळेचे काम करण्यात आले परंतु कंपनीने काम एक वर्ष्याच्या आत करून देण्याच्या नादात निकृष्ट दर्जाचे काम करून सैनिक शाळेच्या विद्यार्थांच्या जीवाशी खेळन्याचे काम नियती कंपनीने करीत आहे.

काम पूर्ण होण्या अगोदर कित्येक वेळा स्लॅब ,भिंती पडण्याचा प्रकार समोर आला आहे. सैनिक शाळेला नियती कंपनीचे चंद्रपूर प्रोजेक्ट प्रमुख यांनी एक वर्षात काम पूर्ण करून देण्याचा गडबडीत निकृष्ट काम केले गेले अशी माहिती कंपनीत काम करत असण्याऱ्या काही कर्मचाऱ्यांनी दिली. सरकार जनतेचा कोट्यवधी रूपये अश्या उत्तम कार्यात लावत आहे. या सैनिक शाळेच्या मध्येमातून मुलांचे भवितव्य घडण्याची आशा नागरिकांना आहे. नियती च्या निकृष्ट बांधकामामुळे एखादा अपघात होण्याचे नाकारता येत नाही . तिथे शिकायला येणाऱ्या निरागस विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळन्याचा प्रयत्न नियती कडून होत आहे
सैनिक शाळेच्या नियतीने केलेल्या निकृष्ट बांधकामाची व चंद्रपूर प्रोजेक्ट प्रमुख यांची चौकशी व्हावी अशी मागणी सर्व सामान्य जनता करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here