बल्लारपूर पोलिसांची उत्तम कामगिरी गुप्त माहितीच्या आधारे पकडली 9 लाखाची दारू

0
105

 

बल्लारपूर :अक्षय भोयर (ता.प्र)

बल्लारपुर

मुल वरून एक ओमनी कार अवैध दारू च्या पेट्या घेऊन बल्लारपुर च्या दीशेने येत असल्याची माहिती मिळाली, त्या आधारे पोलीस निरीक्षक शिवलाल एस. भगत साहेबांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड आपल्या टीम ला सोबत घेऊन मानोरा गावा लगत काही गावकर्यांणा संपूर्ण माहिती दिली व सापळा रचला ओमनी कार ची वाट पाहत असतांना रात्रीच्या काळोख्यात एक चार चाकी कार येत असताना दिसली त्याला टॉर्च दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला असता चारचाकी वाहन चालका ने गाडीची स्पीड वाढवून पळ काढन्याचा अयशस्वी प्रयत्न केला.त्या गाडीचा पाठलाग करुन काही अंतरावर गाडीला पकडण्यात आले,तर कार चालकाच्या बाजूने बसलेला व्यक्ती मात्र रात्रो अंधाराचा फायदा घेत पसार झाला,

गाडीची झडती घेतली असता त्यात 40 खरड्याच्या बाॅक्स मध्ये 4000 देशी दारू च्या बाॅटल आढळून आल्या,सदर दारु पंचा समक्ष जप्त करण्यात आली असून आरोपी नितेश नर्मलवार सह पोलीस स्टेशन बल्लारपुरला आन्यात आले.दोघा विरुद्ध म, दा, का, कलम(65) अ,83 गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपी नितेश यशवंत नर्मलवार (26)रा, कुसराला ता, मूल, फरार आरोपी रमेश अण्णा रा, मूल यांचा वर गुन्हा दाखल करण्यात आला असुन संपूर्ण मुद्दे माल अंदाजे की, 9,00,000 रु कीमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे

सदर कारवाई पोलीस निरीक्षक शिवलाल एस.भगत साहेबांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड,सुनील कांबळे,शरद कुडे,सुधाकर वरघणे,स्वप्नील देरकर,श्रीनिवास वाभीठकर,चंद्रशेखर माथनकर, संतोष दंडेवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here