सामाजिक कार्यकर्ते केतन जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

0
100

 

राजुरा:

राजुरा येथील सामजिक कार्यकर्ते केतन जुनघरे यांच्या वाढदवसानिमित्त राजुरा शहरातील साई नगरातील हनुमान मंदिरात मित्रमंडळा तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात कोरोना संकटात देखील 37 राक्तदात्यांनी रक्तदान केले. गेल्या अनेक वर्षांपासून केतन हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. शिबीराचे उदघाटन युवा नेते राजकुमार डाखरे , तथा जेष्ठ नागरिक श्री आनंदराव ताजने यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दिनेश पारखी अॅड.दीपक चटप, सचिन भोयर, सूरज गव्हाणे उपस्थित होते संपूर्ण मित्र परिवारासोबत चंद्रपूर येथील भूमिपुत्र बहुदेशिय संस्थेचे सदस्य , राष्ट्रीय युवा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
कमी वयातच उत्कृष्ट सामाजिक कार्या बद्दल आज समाजातून केतन वर कौतुकाची थाप पडताना दिसत आहे. समाजा प्रति आपण नेहमी कटी बद्ध असून रक्तदान सारखे श्रेष्ठ दान दुसरे नाही म्हणून जन्मदिनाच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे प्रतिपादन केतन ने या वेळी केले. कार्यक्रच्या यशस्वीतेसाठ उत्पल गोरे अतुल ताजने , स्वप्नील वानखेडे, अभिजित गडकरी,प्रज्वल कोंडेकर , तेजस जयपूरकर, अमोल बंडे, उदय बदखल तथा भूमिपुत्र बहू. संस्था सदस्य व मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here