चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्ग (मेन रोड) वाहतुकी साठी बंद

0
101

चंद्रपूर

चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडुन महात्मा गांधी रोडवरील आझाद बगीच्या समोरील नाल्याचे बांधकाम सुरु करण्यात येत असल्याने २२ जुलै पर्यंत सदर रस्ता वाहतूकीसाठी बंद राहणार आहे.    
   शहराचा मुख्य रस्ता असलेल्या महात्मा गांधी रोडवर आझाद बगीचा आहे. या बगीच्यामधुन जाणारा नाला हा पुढे महात्मा गांधी रोड ओलांडुन समोर जातो. मात्र या रस्त्यावरील जूना आर्च ब्रिज खचून नाला पुर्णपणे चोक झालेला असल्याने पाण्याला वाहून जायला जागा उरलेली नाही. त्यामुळे दिनांक १४/०७/२०२० ते दिनांक २२/०७/२०२० पर्यंत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे रस्ता क्रॉसींगमध्ये पाईप टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
   महात्मा गांधी रोड हा शहरातील प्रमुख मार्ग असल्याने हा अत्यंत वर्दळीचा आहे. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सदरील काम त्वरित हाती घेणे अत्यंत गरजेचे असल्याने कामाला तत्परतेने सुरवात करण्यात येत आहे. या खोदकामामुळे रस्ता काही दिवसांकरीता बंद राहणार असून, नागरीकांनी सदर कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here