टीसीएस कंपनीमध्ये चंद्रपुरातील ५०० युवकांना रोजगार द्या – आ. किशोर जोरगेवार

0
95

चंद्रपूर

        कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर टाटा कल्सन्टसी सर्व्हिसेस या कंपनीने देशभरात कॅम्पसमधून नव्या दरम्याच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीत चंद्रपुरातील ५०० युवकांना रोजगार देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीचे  पत्र त्यांनी टीसीएसच्या व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांना पाठविले आहे.

      कोरोनाचा  प्रादुर्भाव  रोखण्यासाठी  लागू  करण्यात   आलेले  लॉकडाऊन  आता शिथिल करण्यात येत असले तरी कोरोनाचा वाढता  संसर्ग पाहता पुन्हा अनेक भागात लॉकडाऊनची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा उद्योगधंदे, अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. इतर क्षेत्रासह आयटी क्षेत्रावरही याचा परिणाम जाणवत आहे. अशात टीसीएस तर्फे करण्यात येत असलेली भरती बेरोजगार युवकांसाठी दिलासादायक आहे. या भरतीचा लाभ चंद्रपुरातील युवक युवतींनी घेण्याचे आव्हान आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.  तसेच टीसीएस कंपनीमध्ये चंद्रपुरतातील ५०० युवकांना रोजगार देण्यात यावा अशी मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या संदर्भात टीसीएसच्या व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांना पत्र पाठविले आहे.  कोरोना काळात टीसीएस कंपनीने काढलेली पदभरती तरुणासाठी दिलासा देणारी आहे. मात्र ही पदभरती घेत असतांना नक्षली भाग म्हणून ओळखल्या जाणार्या चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी सदर पत्रातून आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here