बल्लारपूर येथे पाऊसामुळे पडले घर

86

बल्लारपूर शहरात पाऊसामुळे पडले घर

बल्लारपूर -अक्षय भोयर(ता.प्र)
बल्लारपूर नगर परिषद मध्य असलेले विवेकानंद वॉर्ड मधील भैय्याजी त्रिंबके यांचे राहते घर पाऊसामुळे पडल्याची घटना घडली . राहत्या घराचे नुकसान झाल्या मूळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे
नगर सेवकांना जनता मोठ्या आशेने निवडणुकीत निवडून देतात कारण जनतेला आपले प्रश्न नगरसेवकांच्या मार्फत नगरपरिषदेत मांडुन न्याय मिळावा . विवेकानंद वॉर्डातील जनतेनी प्रभाग निहाय २ मध्ये नगरसेवक निवडून दिले.विध्यानगर व विवेकानंद वार्ड असा प्रभाग आहे त्यात विवेकानंद वार्ड मधून भाजपाचे नगरसेवक आहे , त्यांच्या आळशी पणाला जनता मागील ४ वर्षपासून त्रस्त आहे, पाऊसामुळे
विवेकानंद वार्ड मधील रहवाशी भय्याजी त्रिंबके यांनी स्वतः नागरसेवकांशी संपर्क साधून त्यांना राहते घर पडल्याचे सांगून नगर परिषद कडून मदत मिळावी अशी अपेक्षा करीत आपली परिस्तिथी सांगितली . आज २ दिवस झाले असे सांगितलयावर सुद्धा , स्थानिक नगर सेवकांनी पडलेल्या घराची चौकशी सुद्दा केली नाही , वार्डात असे कित्येक प्रश्न आहे जे सोडविन्यात ते अपयशी ठरले आहे. जनतेच्या प्रश्नांची त्यांना काही घेणं देणं नाही असे , स्वतः नगरसेवकांचे म्हणणे आहे. मला जनतेने फुकट मतदान केलेले नाही ,अश्या शब्दात प्रभागातील कित्तेक नागरिकांना हुसकावून लावणारे नगरसेवक फक्त पद घेऊन घरा पुढे नगरसेवकांची पाटी लावण्यासाठी असते का ? अश्या आळशी नगरसेवकांनी स्वतः पदाचा राजीनामा द्यावा अशी प्रभागातील जनतेची मागणी आहे ,