लॉकडाऊनचे सक्तीने पालन करा अन्यथा सक्त कारवाई करु : डॉ.महेश्वर रेड्डी

125

सक्त कारवाई करु : डॉ.महेश्वर रेड्डी

चंद्रपूर


संपुर्ण 10 दिवस शहरात कडक बंदोबस्त असेल,बाहेर पडाल तर कारवाई होईल. लॉकडाऊन दरम्यान, बाहेरून येण्यासाठी असणारे शहरातील सर्व रस्ते बंद असतील. जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये 10 दिवस येवू नये,आपल्या आरोग्यासाठी हा लॉकडाऊन असून त्याचे सक्तीने पालन करा,असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

लॉकडाऊनसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांना जिल्ह्यात व जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाता येणार नाही.लॉकडाऊन दरम्यान सर्व पोलिसांची पेट्रोलिंग होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असणार आहे. प्रशासनाच्या सूचना उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

वैद्यकीय बाबी व दूध विक्रेते तसेच डब्ल्यूसीएलचे कर्मचारी, थर्मल पावर स्टेशनमध्ये काम करणारे कर्मचारी यांना मुभा असणार आहे. तसेच शासकीय कर्मचारी पास दाखवून आपल्या कामाच्या ठिकाणी दाखल होऊ शकतात.

पोलीस योद्धा म्हणून पोलिस प्रशासनाने सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. युवक-युवतींनी जास्तीत जास्त पोलिस योद्धा म्हणून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर पोलीस प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी.