रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना जॉब मध्ये सुरक्षेबाबत मागणी

0
147

 

चंद्रपुर

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत मागील २०११ पासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे करीत आहेत वेळोवळी वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी व कामे व्यवस्थित पार पाडत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना तसेच 33 कोटी वृक्षलागवड, नवसंजीवनी, गाळमुक्त शिवार, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, पालकमंत्री पांदण रस्ते, प्रधानमंत्री आवास योजना,आधार सिडिंग,हरितसेना नोंदणी तसेच निवडणुकीच्या संदर्भातील कामे, केंद्रशासन व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत जसे की रेल्वे, ग्रामीण जीवन्नोती योजना यांच्यासह अभिसरण अंतर्गत कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण करत आहेत.

देशात कोविड १९, सारख्या महामारीच्या काळात देखिल आरोग्य, गृह व महसूल विभागप्रमाणेच रोहयो कर्मचारी आपल्या जीवांची पर्वा न करता कोणत्याही शासकिय सुविधा किंवा विमा नसतानाही लॉकडाऊन च्या काळात दिवसाला 70 हजार मजुरांना कामे उपलब्ध करून देऊन रोजगार मिळवून दिलेला आहे. सुरू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिल्ह्यातील 79 हजार कुटुंबातील 150843 मजुरांचा हाताला काम देऊन, त्यांना वेळीच 15 दिवसाच्या आत वेळीच मजुरी देण्याचे काम लखलखत्या ऊन्हात या कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत झालेले आहे.

सन २०११ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती त्याच प्रमाणे आता सुध्दा इतर बाह्यस्थ संस्थेमार्फत नियुक्ती न देता कंत्राटी कर्मचारी यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा व अनुभवाचा विचार करून व इतर दुसऱ्या बाह्यस्थ संस्थेमार्फत पिळवणूक होऊ नये या करिता पुन्हा नियुक्ति देताना सेतू संस्थेमार्फतच द्यावी तसेच जॉब मध्ये सुरक्षा देण्यात यावे. याबाबत मागणी करीत निवेदन दिले आहे.

जिल्हास्तरीय आणि तालुका स्तरीय सर्व कंत्राटी कर्मचारी ह्यांना न्याय मिळण्या करिता व भविष्य काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होऊ नये अशी मागणी रोहयो कंत्राटी ककर्मचारी संघटने कडून करण्यात येत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here