चंद्रपूर मनपा चा हलगर्जीपणा : निमेश मानकर

0
81

 

चंद्रपूर:

शहरातील दरीया नगर येथील नागरिकांना वॉर्डातील असुविधांमुळे अनेक समस्याना तोंड दयावे लागत आहे . दोन वर्षापूर्वी वॉर्डातील नागरिकांनी मनपा ला निवेदन देऊन सुद्धा काहीच न झाल्याने नागरिकांनी लोक वर्गणी गोळा करून श्रमदानातुन रस्ता बनवला होता, मात्र आता त्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्यावर चालणे फार अवघड झाले आहे ,रस्ता खराब झाल्याने नागरीकांना चालतांना अडचण निर्माण होत असून घसरण असल्याने अपघात होण्याची भीती आहे .रस्त्याचा बाजुला गड्डा असल्याने गड्ड्यातील विषारी किडे, साप घरामध्ये येत असल्याने नागरिकांमध्ये भितीच वातावरण निर्माण होत आहे. वॉर्डात रस्ता आणि नालीची व्यवस्था नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे, त्याचा परिणाम नागरिकांच्या तब्येतीवर होत आहे. या प्रभागातील नगरसेवकांना सुद्धा अनेकदा याबद्दल माहिती दिली पण लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियेतेमुळे याचा काहीच उपयोग झाला नाही . मागील 20 वर्षापासून नियमितपणे न चुकता इथिल नागरीक चंद्रपुर महानगरपालिकाला कर भरतात त्यामुळे त्यांना आवश्यक गरजांची पूर्तता का करण्यात येत नाही याबाबत मनपा आयुक्तांना निमेश मानकर यांनी विचारणा केली तसेच लवकरात लवकर वार्डातील समस्या सोडविण्यात याव्या करीता निवेदन देण्यात आले असता रस्त्याचे लवकरात लवकर काम सुरू करू असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले , मात्र 20 दिवस होऊन सुद्धा मनपा तर्फे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे येत्या काही दिवसात मोठे आंदोलन करू अशी माहिती शरद पवार विचार मंच चे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांनी दिली.

यावेळी मनपा आयुक्तांना निवेदन देतांना शरद पवार विचार मंचाचे प्रेदश उपाध्यक्ष शशकांत देशकर, जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, संजय तुरीले, प्रभाग अध्यक्ष शुभम प्रजापती, पवन खोबरागडे, खेमराज कोंडावार, रूपेश दंनडावार, निलेश चटपलीवार, चेतन बोलीवार आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here