पानठेला व्यवसाय सुरू करा – तहसीलदार यांना निवेदन

0
97

 

बल्लारपूर-अक्षय भोयर(ता प्र)

बल्लारपूर-

सर्वत्र कोरोना कोव्हिडं १९ या महामारीने ग्रासले असतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन ची घोषणा केली त्यात संपूर्ण कार्यालये ,व्यवसाय,कारखाने,बंद करण्यात आले व घरी राहा सुरक्षित राहा असा संपूर्ण देशाला व राज्याला मंत्र दिला यात सर्वच कार्यालये ,व्यवसाय ,कारखाने बंद होते व सर्वानीच या बंद ला समर्थण दिले.मात्र १,२,३ अश्या लोकडाऊन मध्ये हळूहळू संपूर्ण कार्यालये,व्यवसाय,कारखाने सुरू करण्यास सुरुवात झाली व लोकडाऊन ४ मध्ये सवर्च व्यवसायांना सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

मागील चार महिन्यांपासून आम्हा पानठेला व्यवसाईकांचा व्यवसाय बंद आहे. आमचे व्यवसाय बंद असून बल्लारपुरात जवळपास ५०० ते ६०० पानठेला व्यवसाईक आहेत त्याच्यावर अवलंबून असलेली जवळपास १५००ते १६०० परिवाराला उपासमारीची पाळी आली आहे. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा याचा प्रश्न आम्हा पानठेला व्यवसाईकांवर आला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन ४ संपल्यानंतर अनलॉक १ व २ या मध्येसुद्धा पानठेला व्यवसाय सुरू करण्यास आदेश मिळाले नाही.

याची सरकारने दखल घेऊन पानठेला व्यवसाय पूर्णता सुरू करा अन्यथा पानठेला आम्हा पानठेला व्यवसाईकांना प्रत्येकी १०,०००/- प्रति माह मानधन सुरू करावे अशी विनंती करण्यात आली .या वेळी निवेदन देतांना उपस्तीत, ,अरुण भटारकर, सुजय वाघमारे,बाबा शाहू,अनिल टपाले, सचिन धामणकर,देशपाल सौदागर, अरुण कोरडे,देवानंद देशभ्रतार ,नरेंद्र लाहोरे, आदी सर्व पदाधिकारी व सदस्य ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here