बल्लारपूर शहरात एकाच दिवशी 3 कोरोना बाधित

0
106

 

बल्लारपूर: अक्षय भोयर (ता.प्र) :

दिवसेंदिवस कोरोना चाचणीत वाढ होत असल्यामुळे तसेच बल्लारपूर शहरातील अनेक परगाव किंवा परजिल्ह्यात असलेले नागरिक परतत असल्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात होत आहे.
१८ जुलै २०२० ला बल्लारपूर शहरात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याची माहिती आहे यामध्ये लोकमान्य टिळक वार्ड युको बँक मागील परिसर येथील ३७ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे सदर महिला आपल्या पतीच्या उपचारासाठी हेद्राबाद शहरातुन परत आल्यावर गृह अलगिकरणात होत्या त्यांची चाचणी ही पॉझिटिव्ह आली.
तसेच याच परिसरातील WCL कॉलोनी परिसरातील २५ वर्षीय युवक देखील कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळाली हा युवक हेद्राबाद येथे एका कम्पनीत कार्यरत होता १४ जुलै रोजी तो रेल्वे ने शहरात दाखल झाल्यावर संस्थात्मक अलगिकरणात होता त्याचा नमुना देखील पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे त्याचेवर देखील उपचार सुरू आहे तसेच बल्लारपूर शहरातील बालाजी वार्ड टीचर कॉलोनी परिसर येथील ३८ वर्षीय पुरुष व्यावसायिक असून तो राजस्थान वरून ८ जुलै रोजी शहरात दाखल झाला असता संस्थात्मक अलगिकरणात होता त्याचे नमुने तपासले असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली यावरून स्थानिक प्रशासनाने संबंधित रुग्ण मिळालेल्या परिसराचे अवलोकन करून संबंधित परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू केली असून या परिसरात दिनांक १९/०७/२०२० ला सविस्तर मार्गदशक सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरात कुणीही परजिल्हा/परराज्यातून प्रवास केलेला नागरिक आढळून आल्यास याची सूचना प्रशासनाला द्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here