ओवळा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

0
104
तळोधी (बा.)
     वनपरिक्षेत्र अंतर्गत, नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील जगदिश फागोजी मोहुर्ले (40) हा शेतकरी शेतात ट्रॅक्टर सुरु असतांना मोटरपंप सुरू करण्यासाठी नदी काठावर गेला मात्र तो परतलाच नाही. म्हनून ट्रॅक्टर ड्रायव्हर ने शोधाशोध केली व नंतर गावकऱ्यांना बोलवून शोधत असतानाच मोक्याच्या ठिकाणी वाघाचे पगमार्क दिसून आले. व वाघाने ठार करून ओढून नेल्याचे लक्षात आले.  मांगरुड शिवारातील गोविंदपुर बिटात हल्ला करुन ठार केले. रात्री शेजारच्या शेतशिवारात म्रुतदेह आढळून आले. हि घटना सायंकाळी.६ ते ७ चे सुमारास घडली.
             शेतकर्यांवर सतत होनारे हल्ल्ययांमुळे शेतकर्यांत फारच भितीचे वातवरण निर्माण झाले आहे सध्या असलेले शेतीचे हंगामाची वेळ व त्यात ही परिसरात वाघाची दहशत, यामुळे लोकांमध्ये विभाग व वाघा बध्दल रोष असुन वाघाचे तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
पुढील तपास तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अभीलाषा सोनटक्के व वनविभाग ची चमू करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here