डारसल लॉजिस्टिक प्रा.लिमिटेड कंपनीच्या चौकशीचे आदेश

0
80

बल्लारपुर

बल्लारपुर क्षेत्र वेकोलिचे गोवरी उपक्षेत्र मध्ये कार्यरत डारसल लॉजिस्टिक प्रा.लिमिटेड द्वारा आपल्या कर्मचारांचे पिळवणूक व शोषण केल्या प्रकरणी टी. के. सिंह लेबर कमिश्नर (सेंट्रल) नागपुर यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांनी गोवरी उपक्षेत्र चे सब एरिया मैनेजर याना पत्र देऊन सात दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे
उल्लेखनीय आहे की डारसल कंपनी द्वारा वेकोलि अधिकाऱ्यानं सोबत मिलीभगत करून कंपनीच्या कामगारांचे EPF, मिनिमम वेजेस,जसे फंड हडपले व कामगारांचे शोषण केल्याची तक्रार भाजपा कामगार मोर्चा चे प्रदेश महासचिव अजय दुबे यांनी केली होती.
कामगार नेते अजय दुबे यांच्या तक्रारी वरून माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कोयला मंत्री प्रल्हाद जोशी यांनापत्र लिहून सादर प्रकरणाची चौकशी सी बी आई मार्फत करण्यात यावी अशी मागणी केली
अजय दुबे यांनी वेकोलि अधिकारि आणिं लेबर कमिश्नर कार्यालय याना इशारा दिला कि या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील ? कारण या अगोदर सुद्दा अशा प्रकारचे मामले सामोर आले होतें परंतु कंपनी आणि वेकोलीचे अधिकारी यांनी आपसात सांठगांठ व लीपापोती करून प्रकरण दाबण्यात आले. जर या प्रकरणात कामगारांना न्याय मिळाला नाही तर कोर्टात केस दाखल करू असा इशारा कामगार नेते अजय दुबे यांनी दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here