वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, तेलंगणा मार्गावरील घटना

0
128

 

चंद्रपूर:-

जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कविटपेठ गावातील शेतकरी शेतात काम करून बैलांना घरी परत घेऊन येत असताना रोड च्या कडेला असलेल्या वाघाने तुळशीराम आत्राम (60) या शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली. आता शेतीचा हंगाम सुरू असून शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना या घटने मुळे भीतीचे वातावरण पसरले आहे, या घटनेची गावकऱ्यांना माहिती मिळताच गावकऱ्यांनी वनधिकाऱ्यांना माहिती दिली वन अधिकारी तात्काळ घटना स्थळी पोहचले व जखमी तुळशीराम आत्राम यांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. चिंचोली कवीटपेठ रोड वरील घटना आहे. या रोडने वाहतूक सतत सुरू असते हा मार्ग तेलंगना राज्याकडे जाणारा मार्ग आहे. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here