चक्का जाम : कोळसा वाहतुक ठप्प झाल्याने वेकोलीचे लाखोंचे नुकसान

0
80

 

चंद्रपूर

आज दुपारी घुग्घुस येथील बैरमबाबा मंदीरा जवळील वेकोलीच्या रस्त्यावर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळी कोळसा वाहतुक करणा-या ट्रकांच्या लांब रांगा लागल्या कोळसा वाहतुक ठप्प झाल्याने वेकोलीचे लाखोंचे नुकसान झाले.
शेवटी घुग्घुसचे पोलीस निरिक्षक राहुल गांंगुर्डे यांनी मध्यस्थी करुन सायंकाळी वाहतुकदारांची बैठक बोलाविल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

घुग्घुस परिसरातील वेकोलीच्या कोळसा खाणीतुन कोळसा वाहतुक करण्याचे कंत्राट एच आर जी, डि ए आर सिएल, चढ्ढा ट्रान्सपोर्ट, कॅलिबर व गोलछा या बड्या कंपण्यांना दिला त्यामुळे स्थानीक एकेरी ट्रक मालकांवर उपास मारीची वेळ आली आहे. बड्या ट्रान्सपोर्ट कंपण्या कंपण्या एकेरी ट्रक मालकांच्या गाड्या वाहतुकीसाठी लावत नाही त्यामुळे हे ट्रक मालक संकटात सापडले आहे.

कमी भाड़े दराने ह्या बड्या कंपण्या कोळसा वाहतुक करीत आहे. कोळसा खाणीतुन कोळसा वाहतुकीत घोटाळा होत आहे . काम नसल्याने स्थानीक ट्रक मालकांच्या १५० ते २०० ट्रक हे उभे आहे. त्यामुळे स्थानिक एकेरी ट्रक मालकांच्या गाड्या बड्या ट्रान्सपोर्ट कंपण्यांनी लावाव्या अशी मागणी करण्यात आली होती.

चक्काजाम आंदोलनात श्रमीक एल्गार संघटनेचे रवीश सिंग, राष्ट्रीय जनरल मजदुर युनियन चंद्रपूर घुग्घुस अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला, यंग चांदा ब्रिगेड कामगार संघटनेचे अबरार अहमद, राष्ट्रीय जनरल मजदुर युनियनचे कार्याध्यक्ष राकेश खोब्रागडे, सरचिटनीस सुदर्शन पोलु, कोषाध्यक्ष संतोष गुप्ता, उपाध्यक्ष श्याम आरकिल्ला, सचिव रोहीत जयस्वाल, उपाध्यक्ष भास्कर कलवेनी व सतिश कोहळे सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here