महाज्योती संस्था सुरू करून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्या

96

 

चंद्रपूर
इतर मागास वर्ग, विजाभज, व विशेष मागास प्रवर्गातील युवक व युवतींना प्रशिक्षण व विविध उपक्रम राबविण्यासाठी स्थापना झालेल्या महाज्योती संस्था लवकरात लवकर कार्यान्वीत करून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा बल्लारपूर यांनी केली आहे
राज्य शासनाने इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील युवक व युवतींसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी बार्टी व सारर्थीच्या धर्तीवर महाज्योती ही स्वायत्त संस्था ६ जुलै २०१९ ला स्थापन करण्यात आली.

महाज्योती स्थापन होवून एक वर्षांचा कालावधी लोटला असताना सुध्दा सुरू करण्यात आलेली नाही. यासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष गणपती मोरे, योगेश पोतराजे, नरेश ताजने, राजेश बट्टे, विलास ताजने, स्वप्नील वाढई, गजानन उपरे, चंदु आगलावे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार बल्लारपुर यांचे मार्फत मुखमंत्री साहेब व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन पाठविण्यात आले,

महाज्योती ला सुरूवात करून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्याची मागणी केली.राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा बल्लारपूर यांनी केली आहे,महाज्योती संस्थेस लवकरात लवकर सुरू करण्या यावे. त्यामुळे आता महाज्योती व्दारे ओबीसी विद्यार्थांना स्पर्धा परिक्षा तसेच त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे.