वेकोलि कुचना वसाहती परिसरात आढळला कोरोना बाधित

0
94

 

माजरी प्रतिनिधी दि.२१.७.२०२०

माजरी-माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना वसाहतीच्या समोर असलेले एका ४३ वर्षीय चिकन विक्रेते कोरोना पॉजिटिव झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना संक्रमित व्यक्तीचे कुचना वसाहतीच्या समोर चिकन चे दूकान आहेत. भाजीपाला आणि फळ सुद्धा विकत होता. सदर व्यक्ती उत्तरप्रदेशच्या कानपुर येथून १६ जुलै रोजी कुचना येथे आला.दरम्यान त्या व्यक्तीला होम कोरोंटाइन करण्यात आले. त्याचे नमूने घेवून चाचणी करिता पाठविण्यात आले होते दरम्यान सोमवारी संयकाळी ६ वाजताच्या दरम्यान त्याचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉजीटिव आले अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी संजय आसुटकर यानी दिली.
सदर व्यक्ती कोरोना पॉजिटिव असल्याची माहिती कुचनाचे सरपंच वर्षा ठाकरे यांना मिळताच संबंधित अधिकारी, वेकोलि प्रशासन, तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी व ग्राम दक्षता समितीला सूचना देवून सदर व्यक्तीला तत्काळ येथून हलविण्यात यावी अशी मागणी केली.
काल सायंकाळ पासून प्रशासन ला तो व्यक्ती कोरोना पोजिटिव्ह असल्याची माहिती असून सुद्धा त्या आज बातमी लिये पर्यंत हलविले नाही आज सकाळी 6 वाजता पासून कुचना सरपंच सदर व्यक्ती च्या घरा जवळ उभी राहून संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करत होती. परंतु प्रशासन यावर गंभीर नाही सदर व्यक्ती काल रात्रभर विसलोन गावात मित्रा कडे होता व नजिकच्या नागलोन गावात जाऊन त्यांनी सलून मध्ये दाडी बनवली चिकनची दुकान खोलून चिकन विकले श्रावण सोमवार सुरू होत असल्याने रविवारला त्याचे चिकन सेंटर मध्ये खूब गर्दी होती सोबत भाजीपाला व फळ ही विकले. त्या व्यक्ती च्या संपर्कात अनेक लोक आलेले आहे त्यामुळे माजरी-कुचना-विसलोन-नागलोन व पाटाळा क्षेत्रात खळबळ उडाली आहे त्यामुळे भीती चे वातावरण पसरले. भद्रावती तालुका वैद्यकीय अधिकारी संजय असुटकर यांना या संदर्भात विचारणा केली असता आम्हाला हेच काम आहे का गावकऱ्यांचीही जवाबदारी आहे असे उद्गट उत्तर एक जवाबदार डॉक्टर यानी दिले.
सरपंच वर्षा ठाकरे यानी आमदार प्रतिभा धानोरकर यांना याची संपूर्ण माहिती दिली. दरम्यान आमदार प्रतिभा धानोरकर यानी तत्काळ दखल घेत अधिकाऱ्याना कुचना येथे जाण्याकरिता सूचना केल्या. सूचना मिळताच तहसीलदार महेश शितोडे, संवर्ग अधिकारी, पोलीस प्रशासन आणि आरोग्य अधिकारी आले. कुचना वसाहत आणि कोरोना पोजिटिव्ह व्यक्तीच्या घर परिसर संपुर्ण सील केले.

केंद्रीय विद्यालय ऑनलाइन अभ्यास 15 साठी बंद .
केंद्रीय विद्यालयात ऑनलाइन विद्यार्थ्यांनचे अभ्यास सुरू होते त्यांना माहिती होताच त्यांनी सर्व शिक्षकांना शाळेत येण्यास मनाही केली व नोटीस काडून 15 दिवस सर्व ऑनलाइन अभ्यास बंद केले
-प्राचार्य दिवाकर मिश्रा

वेकोली माजरी चे महाप्रबधक होम कोरोन्टाईन असताना कामावर रुजू कामगारांत व अधिकारी वर्गात भीती

वेकोली माजरी चे महाप्रबधक गुप्ता हे दिल्ली वरून परत आल्याने त्यांना घरी होम कोरोन्टाईन केले आहे तरी ते कामावर रुजू झाले व आज माजरी मध्ये खदानीत ही गेले यामुळे वेकोली कामगार आणि इतर अधिकारी मध्ये भीती पसरली आहे. जिल्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पोजिटिव्ह आढळून येत आहे तरी या होम कोरोन्टाइन असलेले अधिकारी वर कुठलेच बंधने नाही हे विशेष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here