शिक्षकाचा नवा आदर्श स्वतःच्या मुलाला केले जि.प.शाळेत दाखल

0
82

 

नांदा फाटा : गणेश लोंढे

सगळीकडे सध्या इंग्रजी शिक्षणाचा प्रसार सुरू असून गाव ते शहरापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये सामान्य कुटुंबातली मूल शिक्षण घेतात आणि यपुर्वीही अनेक विद्यार्थी हे मराठी शाळेतून घडूनच आज मोठ्या पदावर असल्याचे पाहायला मिळतात आणि जे आज मोठ्या पदावर आहेत त्यांच्या चर्चेतून सुद्धा मराठी शाळेचे कौतुक ऐकायला मिळतात मात्र त्यांनाच सध्या आपल्याच पाल्याना मराठी शाळेत दाखल करायचं म्हटलं तर दुर्लक्ष करत असल्याचे दिसते निव्वळ चर्चा किव्हा शाळेचे कौतुक करून काय साध्य होणार जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पहिल्या वर्गात आपल्या पाल्याना दाखल करून कोण पाया रचनार आणि कोण ही उभ भरून काढणार हा मोठा प्रश्न आजच्या घडीला उभा आहे अनेक शिक्षकांची मात्र नामवंत इंग्रजी माध्यनांच्या शाळेत शिक्षण घेतात यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थीच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेताना दिसून येत मात्र जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदा येथिल शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करून सर्वां समोर आदर्श ठेवला आहे महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे या करिता प्रत्येक खेड्यात शाळा सुरू केल्या मात्र परिस्थिती नुरूप विविध योजना मोफत शिक्षण असताना देखील पालकांचा कल इंग्रजी शाळेकडे वळला यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्येला गळती लागल्याचं चित्र आहे मात्र अनेक उपक्रम शील शिक्षकांनी नावीन्य पूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्तेत आमचे विद्यार्थी मागे नसल्याचे दाखवून दिले एवढेच नाही तर आज स्वतःच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करून समाजासमोर आदर्श ठेवला जिल्हा परिषद शाळा येथील विषय शिक्षक संजय पंचभाई यांनी आपल्या मुलाला पहिल्या वर्गात दाखल केले तर सहाय्यक शिक्षक गुलाब राठोड यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता तिसऱ्या वर्गात दाखल केले याचसोबत पालकांशी सातत्याने संपर्क साधून शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गुप्ता , शाळाव्यास्थापन समिती अध्यक्ष तोहीद शेख , शाळेचे सर्व शिक्षक , समिती सदस्य यांनी पालकांच्या भेटी घेऊन शाळेचे उपक्रमांची माहिती देऊन पहिल्या वर्गात तब्बल 17 विद्यार्थी दुसरी मध्ये 2 , तिसरी मध्ये 5, चौथी मध्ये 1 तर पाचवीमध्ये 3 असे एकूण 28 विद्यार्थाना नव्याने दाखल केले , असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी शाळेच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी आनंद धुर्वे यांनी केले तर विविध उपक्रमाबाबत विस्तार अधिकारी रवींद्र लहमागे केंद्रप्रमुख केवळराम तोडे मार्गदर्शन करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here