अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करा

0
93

  चंद्रपूर

        कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपुरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशात नागरिकांच्या सोयीसाठी ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु ठेवण्यात येत आहे. अश्यात नागरिकांच्या सेवेसाठी सुरु असलेल्या या व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी त्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात यावी अश्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्या आहेत.

   आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची भेट घेत लॉकडाऊन दरम्यानच्या परिस्थीचा आढावा घेतला. यावेळी अनेक महत्वाच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्यात.

      चंद्रपुरात अचानक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. असे असले तरी नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही आ. जोरगेवार यांनी केले आहे. वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेत चंद्रपुरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. आज पासून यात थोडी शिथिलता देण्यात आली असून ठराविक वेळेसाठी अत्यावश्यक सेवेची प्रतिष्ठाने  सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या अत्यावश्यक सेवा देत असलेल्या व्यावसायिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच हे व्यावसायिक अनेकांच्या संपर्कात येतात त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या व्यावसायिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात यावी अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here