चंद्रपूर जिल्ह्यातील आज तीन बाधित एकूण संख्या ३०८

0
84

 

चंद्रपूर दि. २१ जुलै :

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३०८ वर पोहोचली आहे. मंगळवारी तीन बाधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यामध्ये वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालेल्या ३०८ बाधितापैकी ६४ बाधित हे जिल्ह्या व राज्याबाहेरील आहेत. तसेच यातील चार बाधित अँटीजेन चाचणीतून पुढे आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये १३ हजार ३७२ नमुने तपासण्यात आले आहे. यापैकी १२ हजार २८६ नमुने निगेटिव्ह आले आहेत .७४७ नमुने प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील १८४ पॉझिटिव्ह कोरोना आजारातून बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या १२४ बाधितांवर उपचार सुरु आहेत.
मंगळवारच्या तीन बाधितांमध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील रहिवासी असणाऱ्या २८ वर्षाच्या युवकांचा समावेश आहे. तामिळनाडू राज्यातून १८ जुलै रोजी परत आलेल्या या युवकाला आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. २०जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली या गावातील आणखी दोन जवळच्या संपर्कातील २२ वर्षीय व ५५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. यापूर्वी याच कुटुंबातील एक पुरुष पॉझिटिव्ह जाहीर करण्यात आला होता. २० जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here