आमदार जोरगेवार यांना अवैध दारू विक्रेत्यांची धमकी

0
78

 

चंद्रपूर –

2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली होती त्यानंतर चंद्रपुरात अवैध दारूचा महापूर आला, अनेकांनी याला आपला रोजगार बनवीत पैसे कमविले व आजही कमवीतच आहे.
अवैध दारूविक्रीवर अजूनही कसल्या प्रकारचे नियंत्रण आलेले नाही, अवैध दारूविक्रेत्यांनी तर पोलिसांना पण ठार केले.
अश्यातच ही अवैध दारूविक्री बंद व्हावी यासाठी जिल्ह्यातील एकमेव आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला आवाज बुलंद केला व ही दारू तस्करी लवकरात लवकर कशी नियंत्रणात येणार यावर पोलीस प्रशासनाशी पाठपुरावा करीत आहे.
परंतु हे सगळं करताना आमदार जोरगेवार यांना अवैध दारू विक्रेत्यांच्या रोषाला सुद्धा सामोरे जावे लागत आहे, या घडामोडीत आमदार जोरगेवार यांना निनावी पत्राद्वारे धमकी मिळाली आहे.
सदर पत्रात आपण आपले काम चांगल्या रीतीने करीत आहे परंतु अवैध दारूविक्री प्रकरणात आपण जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे जाणे बंद करावे अन्यथा आपल्या परिवारातील सदस्यांच्या जीवाशी काही झालं तर त्यासाठी आपण स्वतः जबाबदार राहणार अशी खुली धमकी आमदार जोरगेवार यांना अवैध दारूविक्रेत्याने दिली.
या निनावी पत्राच्या धमकीवर आमदार जोरगेवार यांनी सरळ शब्दात म्हटले की आपल्या विधानसभेच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील आहो, शहराचा विकास कसा होणार याकडे माझे लक्ष आहे, अश्या धमक्यांना घाबरणारा मी आमदार नाही, नागरिकांच्या आरोग्याबद्दल मी सदैव तत्पर आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here