वणीत कोरोनाचा पहिला बळी

0
93

जब्बार चीनी,वणी:

वणी येथून सेवाग्राम येथे उपचारासाठी गेलेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दिनांक 9 जुलैला या महिलेला सेवाग्राम येथे उपचारासाठी गेल्यानंतर कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर वर्धा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये उपचार सुरू होता. मात्र आज सकाळी त्यांची कोरोनाशी झुंज संपली. सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशी माहिती मृतकाच्या कुटुंबीयांतर्फे देण्यात आली.

तेली फैल येथील महिला या दुस-या साखळीतील (पेट्रोल पम्प) रुग्ण होत्या. त्या अऩेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यामुळे त्यांच्यावर वणीतील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होता. मात्र महिलेची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला चंद्रपूर येथे उपचारासाठी रेफर केले. त्या महिलेला चंद्रपूर येथे नेले असता तेथील डॉक्टांनी त्यांना सेवाग्राम येथे उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला.

सेवाग्राम येथे खबरदारी म्हणून नवीन दाखल झालेल्या रुग्णाची व कोरोनासदृष्य लक्षण असणा-यांची आधी कोरोना चाचणी केली जाते. त्यानुसार त्या महिलेची कोरोनाची चाचणी केली गेली. 10 जुलै रोजी त्याचा रिपोर्ट आला व त्यात ती महिला पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here