चंद्रपुरात अँटिजेन टेस्टिंग लॅब सुरू

0
88

चंद्रपूर :

परजिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी वेळीच करता यावी, या उद्देशाने महापालिकेने अँटिजेन टेस्टिंग लॅब स्थापन केली आहे. मागील दोन दिवसात या लॅबमध्ये 157 टेस्ट करण्यात आल्या आहेत. स्थानिक सरदार पटेल शाळेत ही लॅब स्थापन करण्यात आली असून, यात टेस्टिंगचे प्रमाण आणखी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या दिवसाला सरासरी 70 ते 75 टेस्ट केल्या जात आहेत. चंद्रपूर महापालिकेचा हा पहिलाच प्रयत्न असून वाढते रुग्ण लक्षात घेता ही व्यवस्था लोकांसाठी सोयीची ठरत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here