नांदाफाटा येथील पाल कुटूंबाचे घरकुलआभावी धोकादायक घरात वास्तव्य

0
101

 

नांदा फाटा :  गणेश लोंढे

शासनाकडून सर्वसामान्याना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी शासनाकडून सर्वे करण्यात येतो मात्र गरजूंना व पात्र लाभार्थ्यांना डावलून हितचिंतक व जवळील लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात असल्याचा आरोप गरजू असलेल्या कुटुंबाकडून होत आहे घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने पाल कुटुंब त्रस्त झाले आहेत

कोरपना पंचायत समिती अंतर्गत इतर मागासवर्गीय जाती प्रवर्गातील नांदा येथील विधवा निराधार व भूमिहीन असलेल्या श्रीमती गीता भाऊराव पाल यांचे गेल्या अनेक वर्षांपासून टाळपत्री बांधून असलेल्या पडक्या घरात मुला सोबत वास्तव्य करत आहे मोलमजुरी करून संसाराचा गाळा हाकत असतांना अर्ध्यातच पती भाऊराव यांचा आजाराने त्यांचा मृत्यू झाला आणि पतीचे छत्र हरविले आहे
शासनाकडून पाहणी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीन धोरणाने त्यांना घरकुल मिळाले नाही ते टाळपत्री बांधून असलेल्या घरात आपल्या मुलांसोबत जीव मुठीत घेऊन राहत आहे कधी सरपटणारे सा, विचू, विषाणू किडे,यांचा वावर वाढल्याने केव्हाही अनुचित घटना होईल हे सांगता येत नाही जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार काय ? असा संतप्त सवाल पाल कुटुंब करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here