आरोग्ययोद्धा डॉ. निकुंज धांडे यांचे आई वडिलांचे महापौरांनी केले अभिनंदन

0
85

चंद्रपूर

       कोरोना विषाणूमुळे अख्खे विश्व संकटाचा सामना करत आहे. भारतात दिवसागणिक कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. आपले घर, शहर सोडून आज अनेक आरोग्यदूत कोरोना रुग्णांच्या जीवनासाठी अहोरात्र लढा देत आहेत. चंद्रपूरचे एक योद्धा डॉ. निकुंज किशोर धांडे हे आपल्या चंद्रपूर शहरातील डॉ. किशोर धांडे व डॉ. सौ. नीता धांडे यांचा सुपुत्र आहे . व तो जवाहरलाल नेहरू महाविद्यालय व रुग्णालय सावंगी मेघे वर्धा येथे कोविड केअर सेंटर मध्ये आपली जबाबदारी कर्तव्यदक्षतेने पार पाडत आहे. तसेच डॉ. धांडे यांचे जावई डॉ. निखिल अशोक अढाऊ हे सुद्धा इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालय नागपूर येथे कोरोनाशी दोन हात करत आहे.
मा, सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार बल्लारपूर तथा माजी कॅबिनेट मंत्री यांच्या मार्गदर्शनाने दिनांक २४ जुलै, २०२० रोजी महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी डॉ. निकुंज धांडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या आईवडीलांना शुभेच्छा दिल्या व आपले कर्तव्य बजाविणाऱ्या डॉ. निकुंज किशोर धांडे व डॉ. निखिल अशोक अढाऊ यांचे कौतुक केले.
चंद्रपूरचे असलेले डॉ. निकुंज किशोर धांडे M.B.B.S. M.S. जवाहरलाल नेहरू महाविद्यालय व रुग्णालय सावंगी मेघे वर्धा व डॉ. निखिल अशोक अढाऊ M.B.B.S. M.S. हे सुद्धा इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालय नागपूर येथे कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत आहेत. कोरोना रुग्णांची सेवा करणे हे किती धैर्याचे काम आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. या दरम्यान कोरोना सदृश रुग्णांशी संपर्क येत असल्याने पुरेशी काळजी न घेतल्यास कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असते. मात्र याची पुरेपूर कल्पना असून सम्पुर्ण देशातील आरोग्य यंत्रणा आपले काम पूर्ण जबाबदारीने करत आहे. डॉ. निकुंज किशोर धांडे व डॉ. निखिल अशोक अढाऊ हे दोनही आरोग्ययोद्धा असून सावंगी मेघे वर्धा व नागपूर येथे आपले कर्तव्य बजावीत असल्याचा आपल्याला अभिमान आहे. त्यांचे जितके कौतुक केले तेवढे कमीच आहे. तसेच चंद्रपुरवासीयां करीताही अभिमानास्पद बाब असल्याचे मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी सांगितले.
याप्रसंगी उपमहापौर श्री. राहुल पावडे, नगरसेवक श्री. देवानंद वाढई , श्री. संजय कंचर्लावार, श्री. रवी आसवानी, सौ. छबूताई वैरागडे, ॲड. राहुल घोटेकर, डॉ. किशोर धांडे व डॉ. सौ. नीता धांडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here