मुख्याध्यापक असोशिएशन तर्फे गुणवंतांचा सत्कार

0
134

 

*विसापूर:*
चंद्रपूर जिल्ह्यातून इयत्ता 12 वी शालांत परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम द्वितीय तृतीय गुणानुक्रमे आलेले गुणवंत विद्यार्थी कु साक्षी ए.कुंभारे (विज्ञान शाखा),कु इश्या आर. बैद (वाणिज्य शाखा) या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्व-गृही जाऊन चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन द्वारा पालकांसमवेत विद्यार्थ्यांचा सत्कार करन्यातआला.
मागील चार वर्षापासून संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वगृही जाऊन छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून विद्यार्थ्यांचे मनोबल व प्रेरणा देण्यासाठी हा उपक्रम राबवित असून यावर्षीही कोरोना संकटामूळे सोसिअल डिस्टनसिंग पाळत गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वगृही जाऊन पालकासमवेत सत्कार केला व त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. या गुणवंत विद्यार्थी सत्कारासाठी अध्यक्ष नरेंद्र बोबडे,कार्याध्यक्ष रमेशराव पायपरे,सचिव राजू साखरकर, सल्लागार स्मिता ठाकरे,सहसचिव मनोज पावडे ,अनिल मुसळे सदस्य बाबूराम सेन व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here