जिल्ह्यात आज 23 बाधित, एकूण बाधितांची संख्या 382.

106

चंद्रपूर – 25 जुलैपासून चंद्रपूर शहराचा काही भागात लॉकडाऊन मागे घेण्यात आले असताना सुद्धा आज जिल्ह्यात एकूण 23 बाधितांची भर पडली आहे.

यामुळे एकूण बाधितांची संख्या एकूण 382 झाली आहे.

23 बाधितांमध्ये ब्रह्मपुरी 10, भद्रावती 2, चंद्रपूर 3, कोरपना/गडचांदूर 7, नागभीड 1 समावेश आहे.

प्रशासन वारंवार जिल्ह्यातील जनतेला सोशल डिस्टनसिंग पाळण्याच्या सूचना देत असताना काही मोजके नागरिक या नियमांना वाकुल्या दाखवीत आहे, आजच्या बाधितांमध्ये मिळालेले नागरिक हे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे.