पोलिसांची दारू माफियावर धाड, दहा लाखाची दारू जप्त

0
100

 

 

बल्लारपूर – अक्षय भोयर (ता. प्र.)

जिल्ह्यात टाळेबंदी असतांना ही होत आहे दारू तस्करी
२०१४ च्या विधानसभा निवडणुकी नंतर २०१५ मध्ये माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी केली होती, संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी असून दारू तस्कर दुसऱ्या जिल्ह्यातुन अवैद्ध रीत्या दारू आणून चंद्रपूर जिल्ह्यात दारू ची अवैद्ध विक्री करत आहे.

कोरोना संक्रमण काळात मानसाला पर जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे, मग अशा परिस्थितीत अवैध दारू विक्रेते वेगवेगळ्या शक्कली लढवून दारूची तस्करी करण्यात मशगुल असतात, मात्र पोलीस विभागाच्या मुखबिरच्या माहितीनुसार अनेक वेळा दारू पकडली जाते पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आज दि.२५ जुलै २०२० रोजी बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नवीन दहेली, शिवनगर वॉर्ड व गौरक्षण वार्ड अशा ४ ठिकाणी डी.बी पथकामार्फत धाड टाकण्यात आली व यानुसार १) ६२ खरड्याचे बॉक्समध्ये देशी दारू रॉकेट संत्राच्या ६२०० बॉटल अंदाजित किंमत ९,३५,०००/- रु मिळाले, २)३ खरड्याचे बॉक्समध्ये देशी दारू रॉकेट संत्रा च्या ३०० बॉटल अंदाजित किंमत ४५,०००/ रु मिळाले, ३)२ खरड्याचे बॉक्समध्ये देशी दारू रॉकेट संत्राच्या २०० बॉटल अंदाजित किंमत ३०,०००/- रु मिळाले, ४)१ खरड्याचे बॉक्समध्ये देशी दारू रॉकेट संत्राच्या १०० बॉटल अंदाजित किंमत १५,०००/- रु असा एकूण १०,२०,०००/- रु किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला, या दरम्यान सदर दारूची तस्करी करतांना एकूण ६ व्यक्ती असल्याची माहिती आहे. मात्र या पोलीस कारवाई दरम्यान ४ आरोपी फरार झाले तर २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले या नुसार शहजाद शेख व आकाश कलेपल्ली यांना ताब्यात घेण्यात आले सदरचा दारूसाठा व आरोपींना पोलीस ठाणे येथे आणून पो.स्टे अप क्र. ५०२/२०२० मदका ६५(ई) ८३ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून उर्वरित गुन्ह्याच्या नोंदीची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई पोलिस निरीक्षक शिवलाल एस.भगत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक विकास गायकवाड यांच्यासह डी.बी पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here