शिवसेनेचे वतीने दिव्यांग दूत खुशालला सुरक्षितता साहित्याचे वितरण

0
77

चंद्रपूर –

दिव्यांग व्यक्तीच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या दिव्यांग खुशाल ठलाल याना स्वयंचलित ई सायकल वरून पावसाळ्यात जाणे येणे सुकर व्हावे म्हणून चंद्रपूर शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सौ वर्षाताई कोठेकर यांचे वतीने शिवसेना दिव्यांग हिताय उपक्रमांतर्गत एक शेफ्टी हेल्मेट व एक रेनकोट उपलब्ध करून देण्यात आला. तुकुम परिसरातील शाहिद भगतसिंह चौकात संपन्न झालेल्या या उपक्रमाला क्षितिका पान्हेरकर ,आरती देवगडे यांची उपस्थिती होती.
शिवसेना महिला आघाडी द्वारा दिव्यांग हिताय उपक्रमाबद्दल देवराव कोंडेकर ,शोभा खोडके, प्रा .प्राजक्ता वासेकर, प्रा रुकैय्या शेख ,प्रसाद पान्हेरकर, पूजा राखोंडे, सुभाष तेटवार यांनी शिवसेना महिला आघाडी व वर्षी कोठेकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here