रखडलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम सुरु करा  : आ. प्रतिभा धानोरकर 

0
134

 

चंद्रपूर :

वरोरा – भद्रावती मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये भद्रावती येथिल पशुवैद्यकीय रुग्णालयाकरता निधी मंजूर असून बांधकाम अद्याप सुरु करण्यात आले नाही. वरोरा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवास्थानाचे अर्धवट बांधकाम पूर्ण करणे यासह अन्य विषयावर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी काढण्याकरिता संबंधित विभागाला आदेश कडून हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले.

आपल्या भागात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाणात आहे. ग्रामीण भागात पशु कोणत्या रोगाने ग्रस्त असल्यास त्यांवर उपचार करण्याकरिता वेळेवर पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतो. त्यामुळे उपचार अभावी अनेक पशु दगावल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यावर कुठेतरी अंकुश लावण्याची भूमिका घेण्याचे मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.

त्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात योजना राबवित असतात. त्यांची अंमलबजावणी होण्याची गरज असते. अनेक लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहत असल्याचे तक्रारी येत असतात. शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यावी व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ मिळण्याकरिता प्रभावी अंमलबजावणी करा असे अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here