भद्रावती गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई 4 लाखाची दारू जप्त

118

 

भद्रावती,

भद्रावती येथील पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवैध दारू वाहतूकी विरोधात धडक कारवाई मोहीम सुरू केली असून दि.26 जुलै च्या रात्री 4 लाख 80 हजाराच्या ऑफिसर चॉईस दारुसह 14 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भद्रावती येथील पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून दि.26 जुलै च्या रात्री येथील पेट्रोल पम्प चौकात नाकाबंदी केली असता चंद्रपूर कडे जाणारी एम.एच.15 डी.सी.0504 क्रमांकाची होंडा सिटी कार थांबविण्यात आली.या कारच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला असता त्याने दूर अंतरावर कार थांबवून पळून गेला.त्या कारची तपासणी केली असता डिक्कीत आणि मधल्या सीटवर ऑफिसर चॉईस नावाच्या विदेशी दारूच्या 3 हजार 200 निपा आढळून आल्या. या दारूची किंमत 4 लाख 80 हजार रुपये आहे.ही सर्व दारू आणि 10 लाख रुपये किंमतीची होंडा सिटी कार असा एकूण 14 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावतीचे ठाणेदार सुनिलसिंग पवार ,पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार, पोलीस शिपाई सचिन गुरनुले,केशव चिटगिरे,हेमराज प्रधान आणि निकेश ढगे यांनी केली. दरम्यान, गुन्हे शोध पथकाने यापूर्वी 17 जुलै रोजी एक कार ताब्यात घेऊन 1 लाखाचा दारुसह 3 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना पोलीस कोठडीची हवा दाखविली होती.