सलग दुसऱ्या दिवसी बल्लारपूर पोलिसांनी केला लाखोंचा मुद्देमालासह दारू साठा जप्त

0
85

बल्लारपूर : अक्षय भोयर (ता ,प्र)

कोरोनाच्या संक्रमण काळात जिथे माणूस माणसाला भेटण्यापासून दूर जात आहे मानवाला सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे लागत आहे तिथे मात्र दारूची तस्करी मात्र मोठ्या जोरात सुरू आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे . व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे . मात्र अवैध दारूची तस्करी मात्र मोठ्या जोरात  सुरू आहे.
जवळपास मागील 2 दिवसात बल्लारपूर पोलिसांच्या डी.बी पथकामार्फत २६,८०,०००/- रु ची दारू पकडण्यात आली याविषयीच्या वृत्तानुसार २५ जुलै २०२० ला १०,२०,०००/- रु चा दारूसाठा जप्त करण्यात आला.  २६ जुलै ला बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत खबऱ्याच्या गुप्त सूचनेनुसार डी.बी पथकामार्फत घुग्गुस फाईल, भगतसिंग वॉर्ड बल्लारपूर येथिल मॅकझिंन जवळ प्रोव्ही रेड करण्यात आली व त्यात १०० खरड्याचे बॉक्समध्ये १००० बॉटल देशी दारू रॉकेट संत्रा अंदाजित किंमत १५,००,०००/- रु चा दारूसाठा जप्त करण्यात आला तर काळ्या व पिवळ्या रंगाचे आटो क्र MH-34, BQ-185 जुनी वापरात असणारी अंदाजित किंमत ४०,०००/- रुपये, तसेच विना नंबरची एक निळ्या रंगाची सुझुकी कँपनीची एक्सेस मोटर सायकल अंदाजित किंमत ६०,०००/- रुपये असा एकूण १६,६०,०००/- रु किमतीचा माल जप्त करण्यात आला यावेळी मोसीन खान नवाज खान पठाण व प्रवीण नांतर तसेच इतर दोन इसम रा बल्लारपूर फरार आहेत सदरचा माल व आरोपी पोलीस ठाणे येथे आणण्यात आले पो.स्टे अप.क्र ५०६/२०२० ,, ६५(ई)८३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाई शिवलाल भगत पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास गायकवाड यांच्यासह डी. बी पथकामार्फत करण्यात आली. आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here