जीव घोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना योध्यांची चाचणी करा :  खा. बाळू धानोरकर 

0
94

 

चंद्रपूर

कोरोनाशी लढा देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पत्रकार, आशा वर्कर, सफाई कामगार,  पोलीस, पत्रकारांचं आयुष्य फार मोलाचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्याही आरोग्याचा विचार व्हायला हवा. जेणेकरून ते स्वतःच आयुष्य धोक्यात घालून करत असलेली सेवा आणखी निर्धास्तपणे करू शकतील, त्याकरिता या योध्यांची कोरोना चाचणी करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हात मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. या काळात अत्यावश्यक सेवेत डॉक्टर, परिचारिका, पोलीस, पत्रकार, आशा वर्कर, सफाई कामगार इत्यादी कोरोना योद्धे सेवा देत आहेत. अलीकडेच महानगर पालिकेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे. पुढे देखील असाच प्रकारे योद्धे आढळून येण्याचा धोका असून त्यांची कोरोना चाचणी तातडीने करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे.

मुंबई येथे देखील डॉक्टर, परिचारिका, पत्रकार, आशा वर्कर, सफाई कामगार इत्यादी कोरोना योध्यांची चाचणी केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात या योध्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून या योध्यांची चाचणी करण्याची लोकाभिमुख मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here