मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णसेवेच्या संकल्पातुन रक्तदान शिबीर

0
118

चंद्रपूर

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या ज्याप्रमाणे राज्याची परिस्थिती हाताळत आहेत त्याचे देशपातळीवरच नाही तर जागतिक स्तरावर कौतुक होत आहे म्हणूनच कमी वेळात इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना जास्त लोकप्रियता मिळाली आहे आणि आज मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे आज संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कुटूंबाप्रमाणे सांभाळत आहेत
आज याच कुटूंबप्रमुखांचा वाढदिवस
मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शिवसेनेतर्फे रूग्ण सेवाभावाने शिवसेना संपर्क कार्यालय, बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे श्री मनोज पाल व कु. गोमती पाचभाई यांच्या व आयोजनातून रक्तदान शिबीर घेण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना माजी संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुख श्री अजयजी स्वामी तसेच माजी जिल्हाप्रमुख श्री रमेशजी देशमुख उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध भागातील ६० शिवसैनिकांनी आपल्या स्वयंस्फूर्तीने यावेळी रक्तदान करत रूग्ण सेवेचे व्रत पूर्ण करून आपले योगदान दिले.

सध्या संपूर्ण देशात कोविड-१९ महामारीचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेत तसेच महाराष्ट्र सरकारने घालून दिलेल्या निर्बंध व प्रतिबंधाचे कटेकोर पालन करत यावेळी रक्तदान करून रूग्णसेवा करण्यात आली व चंद्रपूर शिवसेनेतर्फे मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना दिर्षायुष्याच्या आणि पुढील वाटचालीस प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाला कंत्राटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री बंडू हजारे, अविनाश पुट्टेवार,आकाश साखरकर,प्रविन खनके,शालिक फाले, नगरसेवक अजय सरकार ,माजी युवासेना जिल्हाप्रमुख सचिन भोयर,पप्पू बोपचे,पंकज सिंग दिक्षीत, रिझवान पठाण,अमोल मेश्राम,कैलाश तेलतुंबडे,तरूण राॅय,नितिन शहा,राजकुमार पाचभाई, श्रीकांत दडमल,तरूण बिस्वास,माधव पाल तसेच अनेक शिवसैनिक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here