SDO लोंढे यांच्या आदेशाने गडचांदूरकरांच्या संभ्रमाला पुर्ण विराम

141

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरात “कोरोना” रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम यांनी गडचांदूरकरांच्या भल्यासाठी कोणतेही शासकिय आदेश नसताना 27 ते 29 जुलै(सोम,मंगल,बुध)अशाप्रकारे शहरात “जनता कर्फ्यू” चे आवाहन करून एकच खळबळ माजवली होती. यामुळे सोशल मिडीयावर याविषयी नानाप्रकारे चर्चांना उधाण आल्याचे पाहून तडकाफडकी रविवार 26 जुलै रोजी शहरातील काही प्रतिष्ठित व्यापारी,सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष शिवसेनेचे नगरसेवक (भाजप वगळता)काही पत्रकार यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले.या बैठकीत विविध मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.यासह इतर बर्‍याच घडामोडी नंतर शेवटी व्यापारी बांधवांच्या सहमतीने 3 दिवसांचा जनता कर्फ्यू 2 दिवस करण्यात आला.असे असताना पुन्हा सायंकाळी शासकीय स्तरावर कोरोना विषयी आढावा बैठक झाली.यात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या निर्देशानुसार SDO जे.पी.लोंढे राजूरा,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी आढावा घेऊन गडचांदूर शहरात लॉकडाऊन लावण्या बद्दल माहिती दिली.28 जुलै ते 2 अॉगस्ट लॉकडाऊन असणार आहे.यात 28 ते 30 कडक तर 31 ते 2 लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे.याविषयी आदेश काढणार असल्याचे SDO लोंढे यांनी यावेळी सांगितले.यानंतर पुन्हा सोशल मीडियावर नागरिकांनी अनेक प्रश्नांचा भडीमार सुरू केला.अगोदर 3 दिवस नंतर 2 दिवस आणि आता सरळ 6 दिवस लॉकडाऊन म्हणजे “काय खरे,काय खोटे” या संभ्रमात शहरवासी पडले होते शेवटी SDO राजूरा यांच्या शासकीय आदेश पत्राने शहरवासीयांच्या संभ्रमाला पुर्ण विराम मिळाला.
दरम्यान सर्व स्थानीक आयएमए डॉक्टरांची बैठक ठेवावी,सर्व आयएलआय रुग्णांवर देखरेख ठेवून त्यांची चाचणी करून घ्यावी,प्रशासन आणि आयएमआय यांच्यात समन्वयाची यंत्रणा स्थापित करावी अशी सूचना डॉ.राठोड यांनी संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या.सदर ठिकाण हे जास्त प्रमाणात औद्योगिक क्षेत्राचे असून बहुतांश कंपन्या विशेषतः सिमेंट कंपन्यांच्या ट्रक चालकांची अधिकाधीक चाचणी याकाळात करण्यात येणार आहे.तसेच याच दरम्यान आयएलआय रुग्णांवर देखरेख व चाचण्या करण्यात येईल.अलगीकरणाची सुविधा वाढविण्यात येणार आहे.बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य विभागाला कळवणे व तपासणी करून संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक आहे.नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा, बाहेर पडताना मास्क वापरावा असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.बैठकीत न.प.अध्यक्षा सौ.सविता टेकाम,उपाध्यक्ष शरद जोगी,कोरपना तहसीलदार महेंद्र वाकलेकर,मुख्याधिकारी डॉ.शेळकी,सहाय्यक पोनि शिंदे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.गेडाम,ता.वैद्यकीय अधिकारी डॉ.नळेसह इतर वैद्यकीय अधिकारी,कर्मचार्‍यांची उपस्थीती होती.
————————————————-
यासर्व घडामोडीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवलेल्या एका सुज्ञ नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर अशाप्रकारे प्रतिक्रिया दिली की, “देशात अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी,कर्मचारी जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस नागरिकांना “कोरोना” विष्णूच्या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी झटत आहे.काही ठिकाणी कामात हयगय करणार्‍यांना सरळ निलंबित ही केले जात आहे.मात्र आश्चर्याची बाब म्हणजे याठिकाणी ज्यांच्या चुकी व हलगर्जीपणामुळे एवढे रुग्ण सापडत आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी याविषयी यांच्यापैकी कुणीही चकार शब्द ही का काढत नाही ! हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.”
————————————————–
फोटो:-SDO लोंढे यांच्या आदेशाने गडचांदूरकरांच्या संभ्रमाला पुर्ण विराम.
▶️शहरात 28 ते 2 “लॉकडाऊन” 3 दिवस कडक तर 3 दिवस शिथिल.