नागरिकांशी अरेरावी करत अश्लील शिवीगाळ करणाऱ्या नगरसेविकेवर  कठोर कारवाई करा – यंग चांदा ब्रिगेडची

0
102

        चंद्रपुर

      वार्ड प्रतिबंधित का केला याची विचारणा केली असता भानापेठ वार्डातील नगरसेविका शीतल कुळमेथे हिने आपल्या परिवारसह नागरिकांशी अरेरावी करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली यावेळी शीतल कुळमेथे यांनी नागरिकांना धक्काबुक्कीही केली. या  धक्काबुक्कीत दुर्गा वैरागडे जखमी झाल्या  आहे. असे असतानाही सदर नगरसेविकेने भाजप पदाधिकाऱ्यांची फौज पोलिसठाण्यात नेऊन दुर्गा वैरागडे यांच्याच विरोधात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे यावेळी महापौर यांची ही उपस्थति होती. त्यामुळे एका साधारण महिले विरोधात तक्रार देण्यासाठी राजकीय दबाव वापरणे योग्य आहे का असा प्रश्न यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने उपस्थित करण्यात आला असून नागरिकांशी अरेरावी करत अश्लील शिवीगाळ करणाऱ्या नगरसेविकेवर  कठोर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

     कोरोना बाधित रुग्ण आढळलेला क्षेत्र खबरदारी म्हणून प्रतिबंधित केला जात आहे. मात्र मनपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रतिबंधित क्ष्रेत्रातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार शहरातील भानापेठ प्रभागातील अंचलेश्वर वार्डात घडला आहे.  कोरोना बाधित रुग्ण आढळला असे सांगत भानापेठ प्रभागातील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. हा भाग प्रतिबंधित करण्यावरून स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी याबाबत भाजपच्या स्थानिक नगरसेविका शीतल कुळमेथे यांना विचारणा केली. मात्र याचे समाधानकारक उत्तर न देता कुळमेथे यांनी येथील नागरिकांशी अरेरावी कारायला सुरुवात केली. यावेळी कुळमेथे यांनी शाब्दिक वाद करत नागरिकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यात दुर्गा वैरागडे झाल्या आहे. या विरोधात दुर्गा वैरागडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र नगर सेविका शीतल कुळमेथे यांनी भाजपची मोठी फौज पोलीस ठाण्यात नेत राजकीय दबाव निर्माण करत दुर्गा वैरागडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांची सेवा करताना कधी न दिसणारे चेहरे एका साधारण महिलेविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीसठाण्यात एकवटलेले दिसले. इतक्या मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमा होत असतांना भाजप पदाधीकार्याना सामुहिक अंतर पाळन्याचेही भान राहिले नाही.  यावेळी खोटी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली.  मात्र राजकीय नेत्यांची दडपशाही आता चालणार नाही. नागरिक आपल्या हक्काप्रति जागरूक झाला आहे. असे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले. तसेच ज्या नागरिकांच्या भरवश्यावर नगरसेवक पद मिळाल त्याच नागरिकांना अशी वागणूक देणाऱ्या नगरसेविका शीतल कुळमेथे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागनीही यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.  या बाबतचे निवेदनही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना देण्यात आली असल्याची माहिती यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्येशी हांडे, विमल काटकर, वैशाली रामटेके आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here