मनसे ने साजरा केला उद्धव ठाकरेंचा अनोखा वाढदिवस

122

चंद्रपूर

लॉकडाऊन काळातील विज बिलासंदर्भात अजूनही गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेमध्ये रोष आहे. परंतु महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री हे महावितरण कंपनीचा पाठराखण करत आहे. नागरिकांना आलेली वीज बिले बरोबर आहे. जनता विज बिल भरत आहे. वर्क फ्रॉम होम मुळे विज बिल वाढले आहे.अशी वायफळ बडबड त्यांची चालूच आहे. महावितरण कंपनीने आपल्या घरचे वीज कनेक्शन कपात करू नये या भीतीपोटी अनेक नागरिकांनी आर्थिक अडचण असतानादेखील वीज बिले भरली आहे.या गोष्टीचा हवाला देत ऊर्जामंत्री नितीन राऊत आपली मिरवत आहे.विरोधक विनाकारण आंदोलने करत आहे असे ते बोलत आहे.पण जबाबदार सरकार म्हणून जनतेला वीजबिल रकमेमध्ये दिलासा देण्याचे काम मात्र अद्याप सरकारने केले नाही. लॉक डाउन काळातील वीजबिलात जनतेला दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर वारंवार आंदोलने ,निदर्शने करत आहे. राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर दौऱ्यामध्ये बैठकीत वीज बिलाचा विषय मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी परखडपणे मांडला. परंतु मंत्रिमहोदय महावितरणाचा दूत बनून आले असे त्यांच्या बोलण्यातून वाटत होते.27 जुलाई महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे वाढदिवस महावितरण कार्यालयात मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांच्या कक्षात केक कापुन व मिठाई वाटून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने साजरा करण्यात आला .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थणा करण्यात आली.त्यांच्या वाढदिवसा निमीत्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपुरच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब,मध्यमवर्गीय जनतेला लॉक डाऊन काळातील विजबिलात दिलासा मिळावा याकरिता lockdown काळातील विज बीलात प्रती यूनिट किमान दर 3.46 रुपये आकारावे,बिलावरील व्याज व इतर शुल्क माफ करावे,बिल भरण्यास 12 महिन्याची मुदत द्यावी आदी सर्व मागण्या करण्यात आल्या.यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांना चांगलेच धारेवर धरले.यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा सुनीता गायकवाड,विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार,शहर अद्यक्ष मनदीप रोडे, जिल्हा सचिव किशोर माडगूळवर,जिल्हा उपद्यक्ष राजु कुकडे, शहर संघटक मनोज ताम्बेकर,शहर उपाद्यक्ष महेश वासलवार,महेश शास्त्रकार इरफान शेख ,विद्यार्थि सेना जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे रूग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता प्रविन शेवते,राकेश पराडकर,तुषार येरमे,मंगेश चौधरी,अंकित मीसाळ,करण तुमसरे,शुभम तोन्ड़रे,आशीष गौत्रे ,अक्षय बल्लेवार आदी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते