चंद्रपूरचा प्राचीन इतिहासात महत्वाची भर

194

 

चंद्रपूर :

– वडीलांचा मृत्यूनंतर मुलाने वडीलांच्या खोलितील संदूक खोलला. त्यात काही नाणे आणि तांब्याची गोलाकार वस्तू सापडली. या वस्तूचा इतिहास समोर आला अन सारेच अवाक झाले. ती साधारण वस्तू नसून चक्क राजमुद्रा निघाली. वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा पृथ्वीसेन व्दीतिय यांची ती राजमुद्रा होती. पाचव्या शतकातील वाकाटकांची ही राजमुद्रा चंद्रपूर जिल्हाच्या प्राचीन इतिहासात भर घालणारी ठरणार आहे. या राजमुद्रेवर राज्यलक्ष्मीचे चित्र अंकित असून ब्राम्ही लिपीत लेख कोरलेला आहे.

चंद्रपूर जिल्हाला प्राचीन इतिहास लाभला आहे. मौर्य,सातवाहन,वाकाटक, हृहय, परमार , नाग, गोंड, भोसले राजांची येथे सत्ता होती. जिल्हाचा कानाकोपर्यात ऐतिहासिक ठेवा विरूरलेला आहे. जिल्हाचा भुगर्भात दडून बसलेला इतिहास आता उजेडात येत आहे. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या प्रकाश उराडे यांच्याकडे अतिशय महत्वाचा ऐतिहासिक ठेवा पडून होता.काही महीण्यापुर्वि त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रंजित उराडे यांने वडीलांचा खोलीत असलेली जूने संदूक खोलले. या संदूकात 60 ग्रम वजनाचा,गोलाकार आकारातील ताब्यांची वस्तू सापडली. ही तांब्याची वस्तू 7 से.मि. लांब,3 से.मि. रूंदीची होती. त्यावर कमल पुष्पावर विराजमान असलेल्या देविचे चित्र अंकित आहे. त्या देविच्या उजव्या हातात कमलपुष्प आहे. चित्राचा खाली ब्राम्ही लिपीत लेख कोरलेला आहे. ही तांब्याची वस्तू महत्वाची वाटल्याने रंजित उराडे याने इतिहास अभ्यासक निलेश झाडे यांची भेट घेतली. झाडे यांनी याचे निरीक्षण केले. झाडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील इतिहास अभ्यासकाशी संपर्क साधत विचारपूस केली. पुणे येथिल अमोल बनकर, अशोक सिंह ठाकूर यांनी तांब्याचा त्या गोलाकार वस्तूवर कोरलेल्या लेखाचे वाचन केले आणि एका महान सम्राटाचा इतिहास उजेडात आला.

वाकाटक राजा पृथ्वीसेन ( व्दीतिय ) ची राजमुद्रा

उराडे यांनी जतन करून ठेवलेली ती वस्तू वाकाटक राजवंशातील शेवटचा राजा पृथ्वीसेन व्दीतिय यांची राजमुद्रा आहे. पृथ्वीसेनाचा कालखंड इ.स.475-495 होता. पृथ्वीसेन यांचे ताम्रपट बालाघाट,मांढळ,माहूरझरी येथे मिळाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे वाकाटकांची राजधानी होती. पृथ्वीसेन व्दीतिय याची राजमुद्रा चंद्रपूर जिल्ह्यात सापडल्याने चंद्रपूरचा प्राचीन इतिहास मोठी भर पडली आहे.

Byte :-1) निलेश झाडे इतिहास अभ्यासक

2) रणजित उराडे

काय लिहीलं लेखात…

राजमुद्रेवर सूरवातीलाच राज्यलक्ष्मीचे चित्र कोरले आहे.अश्याप्रकारचे चित्र गुप्त राजवटीतील सोन्यांचा नाण्यावर अंकित असायचे. त्याखाली ब्राम्ही लिपीत लेख कोरला आहे. या लेखाचे वाचन पुणे येथिल इंडोलाॕजीस्ट अमोल बनकर,इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी केले. लेखात ” नरेंद्रषेण याचा पुत्र पृथ्वीषेणा यांची ही राजमुद्रा ” असे लिहीले आहे.

” नरेन्द्रसेन-सत्सुनौ:_
भर्तुर व्व्वाकाटक श्रीय:-
प्रिथिविषेननृपते
जिगिशौर्ज्जयशासनं “