चोरा येथे शेत शिवारातील घरात वृद्ध दांपत्य आढळले मृत अवस्थेत

106

 

भद्रावती, अब्बास अजानी

भद्रावती तालुक्यातील चोरा येथील शेतशिवारातील घरात एक वृद्ध दांपत्य मृतवस्थेत आढळण्याने गावात खळबळ माजली असून या वृद्ध दांपत्याची आत्महत्या कि नैसर्गिक मृत्यू हे गूढ कायम आहे.
प्रथमदर्शनी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केले असून याबद्दल अधिक चौकशी सुरू आहे.गजानन विठ्ठु आसुटकर वय 75 वर्ष आणि शिला गजानन आसुटकर वय 65 वर्ष असे या मृत वृद्ध दाम्पत्याची नावे आहे. मृतक गजानन आणि शिला आसुटकर हे वृद्ध पतीपत्नी चोरा येथील रहिवासी असून ते चोरा शिवारातील आपल्या मालकीच्या शेतात टिनाच्या एक शेडरूपी घरात राहत होते. त्यांना तीन मुले असून कामधंद्या निमित्याने ते बाहर राहतात. दि.28 ला सकाळी शेतातील त्यांचा घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने काही गावकऱ्यांनी शोध घेतला असता. हे दोघेही वृद्ध पतिपत्नी घरातच मृतवस्थेत आढळून आले.या प्रकरण्याची सूचना त्यांचा मुलांना मिळाल्यानंतर त्यांनी याची माहिती भद्रावती पोलिसांना दिली.त्यांचा मृत्यू तीन ते चार दिवसा आधी झाला असल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. मात्र ही आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू असू शकते नाही.
त्यांच्या मृत्यूविषयी गावात तर्कवितर्क सुरू असून पोलिसांनी या घटनासंबंधी प्रथमदर्शी मर्ग दाखल केला आहे.त्यांच्या मृत्यू विषयी भद्रावती पोलीस अधिक तपास करीत आहे.या घटनेमुळे चोरा येथे खळबळ माजली आहे.