भवानजीभाई हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयचा उत्कृष्ट निकाल

100

*भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपुर विभाग मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर चा वर्ग दहावीचा उत्कृष्ट निकाल लागलेला असून *विद्यालयातील 428 विद्यार्थ्यांपैकी 408 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 95.32 टक्के लागलेला आहे. त्यामध्ये 89 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, 174 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 120 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 25 विद्यार्थी तृतीय श्रेणीत पास झाले आहे* शाळेत पहिला येण्याचा मान किशोर चंदुलाल निषाद ह्याला 93.60% गुण मिळाले आहे. तर द्वितीय उत्कर्ष बाबाराव बोंडे 93.20% तृतीय कु स्नेहा मोहन चौधरी 92.40% ओम नरेंद कपाटे 91.80% कु. सोनल हरिदास फुलकर 91.60% तन्मय कांतीलाल हिंगणकर 91.60%, प्रणय धर्मदास चौधरी 90.80%, प्रयास आनंदराव गोंडाने 90.20%
कु सेजल शंकर बागेसर 90.00% शाळेच्या उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे भारतीय ग्रामीण शिक्षण मंडळाचे अध्यक्ष च्चुनिलालभाई चव्हाण, कार्याध्यक्ष आर्की रमनिकभाई चव्हाण, उपाध्यक्ष एड. वामनराव लोहे, सचिव केशवराव जेनेकर, सहसचिव लक्ष्मणराव धोबे, व इतर संस्था पदाधिकारी, प्राचार्य राजू बनकर सर, उपप्राचार्य तन्निरवार सर, पर्यवेक्षक सी.बी. टोंगे सर, श्रीमती सहारे मॅडम, श्रीमती राऊत मॅडम, श्री अवधुत कोटेवार, श्री देवेंद्र थेरे आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..🙏🏻💐